हॉलिवूडचा जासूस जेम्स बाँड येतोय भारतात

हॉलिवूडच्या फिल्म्सचा जासूस जेम्स बाँड भारतात येतोय. जेम्स बाँडच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जासूसचे खरे नाव डॅनियल क्रेग आहे. हॉलिवूडचा हा जासूस हा भारतात फिरायला येणार नसून चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटायला येणार आहे. मोदींच्या कार्यकाळात ज्या गतीने भारताची प्रगती होतेय त्यावर प्रभावित झाल्याने जेम्स बाँड मोदींची मुलाखत घेणार आहे.

Updated: May 24, 2016, 07:40 PM IST
हॉलिवूडचा जासूस जेम्स बाँड येतोय भारतात title=

नवी दिल्ली : हॉलिवूडच्या फिल्म्सचा जासूस जेम्स बाँड भारतात येतोय. जेम्स बाँडच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जासूसचे खरे नाव डॅनियल क्रेग आहे. हॉलिवूडचा हा जासूस हा भारतात फिरायला येणार नसून चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटायला येणार आहे. मोदींच्या कार्यकाळात ज्या गतीने भारताची प्रगती होतेय त्यावर प्रभावित झाल्याने जेम्स बाँड मोदींची मुलाखत घेणार आहे.

मोदींच्या मुलाखतीनंतर डॅनियल दिल्लीमधील एका चॅरिटी फुटबॅाल मॅचमध्ये सहभाग घेणार आहे. ११ जूनला होणारी ही मॅच नेते विरुद्ध अभिनेते यांच्या संघामध्ये रंगणार आहे. नेत्यांच्या टीमचे नेतृत्व मनोज तिवारी आणि बाबुल सुप्रियो करणार आहेत तर अभिनेत्यांच्या टीमचे नेतृत्व अभिषेक बच्चन, रनबीर कपूर, अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा करणार आहेत. याशिवाय तो मुंबईत जाऊन बॅालिवूड स्टार्सना देखील भेटणार आहे.