जाँटी ऱ्होडसने सपत्नीक केली पूजा

जसा देश तसा वेश अशी म्हण आहे. ही म्हण सध्या जाँटी ऱ्होडसला तंतोतत लागू पडतेय. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जाँटी भारतीय संस्कृतीशी चांगलाच जोडला गेलाय. 

Updated: May 3, 2016, 02:24 PM IST
जाँटी ऱ्होडसने सपत्नीक केली पूजा title=

मुंबई : जसा देश तसा वेश अशी म्हण आहे. ही म्हण सध्या जाँटी ऱ्होडसला तंतोतत लागू पडतेय. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जाँटी भारतीय संस्कृतीशी चांगलाच जोडला गेलाय. त्याने आपली मुलगी इंडियासाठी सांताक्रुझ येथील एका मठात पूजा-अर्चा केली. एक वर्षांपूर्वी त्याच्या मुलीचा जन्म झाला होता.

यावेळी पुजेदरम्यान जाँटीने पारंपारिक धोतर परिधान केले होते. हे फोटोज त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. या फोटोत पत्नी जीन मुलगी इंडियाला मांडीवर घेऊन बसलीये. तसेच त्याची मुलेही त्यावेळी होती.

मुलीचे नाव का ठेवले इंडिया

मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच बनल्यानंतर जाँटी ऱ्होडसच्या फॅन फॉलोविंगमध्ये वाढली. त्याच्या मुलीचा जन्म सूर्या मदर अँड चाइल्ड रुग्णालयात झाला. मी भारतात बराच काळ घालवलाय. भारतीय संस्कृती, परंपरा मला आवडतात. त्यामुळेच मी माझ्या मुलीचे नाव इंडिया ठेवल्याचे जाँटीने सांगितले होते.