बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला

पॉपस्टार जस्टीन बीबरची नशा त्याच्या चाहत्यांवर अशी काही चढलीय की सांगायलाच नको... एव्हाना जस्टीन स्टेशवर दाखल झालाही असेल... पण, त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची ही नशा जरा जास्तच महागात पडतेय. 

Updated: May 10, 2017, 08:49 PM IST
बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला  title=

मुंबई : पॉपस्टार जस्टीन बीबरची नशा त्याच्या चाहत्यांवर अशी काही चढलीय की सांगायलाच नको... एव्हाना जस्टीन स्टेशवर दाखल झालाही असेल... पण, त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची ही नशा जरा जास्तच महागात पडतेय. 
 
'डीएनए'नं दिलेल्या बातमीनुसार, कार्यक्रमासाठी स्टेडियममध्ये दाखल झालेल्या बीबरच्या चाहत्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय... पाण्याच्या बाटलीसाठीही... एखादी बाटलीही हातात लागणं मुश्किल झालंय... आणि ज्यांच्या हातात या पाण्याच्या बाटल्या पडतायत ते त्याच्यासाठी प्रत्येक बॉटलमागे 100 रुपये मोजताना दिसत आहेत.

होय, 20 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी इथं उपस्थित झालेल्यांना तब्बल 100 रुपये मोजावे लागत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, या कार्यक्रमाच्या एका तिकीटासाठी 70 हजार रुपयेही काही चाहत्यांनी मोजल्याचं सांगण्यात येतंय... त्यातच आता नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आणि या स्टेडियमच्या आजुबाजुलाही खच्चाखच गर्दी पाहायला मिळतेय.

जस्टीनच्या पर्पल वर्ल्ड टूर अंतर्गत होणा-या या कॉन्सर्टला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिही हजेरी लावताना दिसत आहेत.