व्हिडिओ : बीबरची 'स्लमडॉग मिलेनिअर' टूर

पॉप स्टार जस्टीन बीबर मुंबईत दाखल झालाय. एकीकडे लोक बीबरच्या कॉन्सर्टसाठी नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये एकच गर्दी होताना दिसतेय. तर दुसरीकडे जस्टिन आपल्या छोट्या - गरिब फॅन्सना भेटताना दिसला. 

Updated: May 10, 2017, 05:28 PM IST
व्हिडिओ : बीबरची  'स्लमडॉग मिलेनिअर' टूर title=

मुंबई : पॉप स्टार जस्टीन बीबर मुंबईत दाखल झालाय. एकीकडे लोक बीबरच्या कॉन्सर्टसाठी नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये एकच गर्दी होताना दिसतेय. तर दुसरीकडे जस्टिन आपल्या छोट्या - गरिब फॅन्सना भेटताना दिसला. 

 

रॉकस्टारला भेटायचंय... पण त्याच्या कॉन्सर्टचं महागडं तिकीट खरेदी करायची क्षमता नसलेली ही गरीब मुलं आहेत... 'स्लमडॉग मिलेनिअर'चा ट्रेन्ड कायम राखत जस्टिननं आपल्या या फॅन्सला भेट देऊन आपल्या दिवसाची सुरूवात केली.  

इतकंच नाही तर आपल्या कॉन्सर्टची १०० तिकीटं जस्टीननं या मुलांना दिली आहेत. त्यामुळे आज ही मुलं जस्टिनच्या कॉन्सर्टलाही हजेरी लावणार आहेत.