जाणून घ्या कबालीचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या अभिनयाने सजलेला कबाली या सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये जगभरातून २०० कोटींचा आकडा पार केलाय.

Updated: Jul 25, 2016, 02:50 PM IST
जाणून घ्या कबालीचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन title=

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या अभिनयाने सजलेला कबाली या सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये जगभरातून २०० कोटींचा आकडा पार केलाय.

तामिळानाडूचे ट्रेड अॅनालिस्ट रमेश बी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार जगभरातून या सिनेमाने २०० कोटीहून अधिक कमाई केलीये. 

त्यापैकी भारतात या सिनेमाने तीन दिवसांत साधारण १२३ कोटींचा गल्ला जमवलाय तर बाकी ८७ कोटींची कमाई केलीये. म्हणजेच एकूण २१० कोटी या सिनेमाने कमावलेत.

कमाईच्या बाबतीच पहिल्याच दिवशी कबालीने सुल्तानला पछाडले होते. भारतात या सिनेमाने पहिल्या दिवशी ४८.९५ कोटींची कमाई केली होती. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० कोटी कमावले. TollyTrendzच्या रिपोर्टनुसार रविवारी या सिनेमाने ३५ कोटींची कमाई केली.