... रेखा रात्री 3 वाजता धडकली कंगनाच्या घरी!

शनिवारी रात्री उशीरा तीन वाजल्याच्या दरम्यान अचानक अभिनेत्री कंगना रानौत हिच्या घराचा दरवाजा धडधडला... आश्चर्यानं जेव्हा कंगनानं आपल्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा तिचं आश्चर्य गगनात मावेना... 

Updated: Feb 2, 2015, 03:03 PM IST
... रेखा रात्री 3 वाजता धडकली कंगनाच्या घरी! title=

मुंबई : शनिवारी रात्री उशीरा तीन वाजल्याच्या दरम्यान अचानक अभिनेत्री कंगना रानौत हिच्या घराचा दरवाजा धडधडला... आश्चर्यानं जेव्हा कंगनानं आपल्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा तिचं आश्चर्य गगनात मावेना... 

थोड्या धास्तावलेल्या परिस्थितीतच जेव्हा कंगनानं दरवाजा उघडला तेव्हा समोर उभी होती अभिनेत्री रेखा... तीही आपल्या हातात कंगनाचं फिल्मफेअर अॅवॉर्ड घेऊन... 

त्याचं झालं असं, की शनिवारी झालेल्या फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये कंगना रानौत हिला 'क्वीन' या सिनेमासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला होता. 

कंगना मात्र या अॅवॉर्ड सोहळ्यासाठी उपस्थित राहिली नव्हती... त्यामुळे, तिच्यावतीनं अभिनेत्री रेखानं हा अॅवॉर्ड स्टेजवर जाऊन स्वीकारला... आणि रात्री 3 वाजता कंगनाला सरप्राईज देण्यासाठी रेखा तिच्या घरी धडकली.

रात्री तीन वाजता अभिनेत्री रेखा आपल्या दरवाजासमोर उभं असलेलं पाहून कंगनाला आनंदाचा धक्का बसला. 

'आपल्याला अॅवॉर्ड मिळेल, अशी अपेक्षाच नव्हती कारण त्या सोहळ्यासाठी मी उपस्थितदेखील नव्हते... आणि अॅवॉर्ड घरी मिळालं तेही रेखाच्या हातून... यामुळे मी खूप खूश आहे' असं कंगनानं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.