'करिनाला मुस्लिम बनवलेलं नाही' : सैफ अली खान

करिना कपूर काही धार्मिक संघटनांच्या निशाण्यावर आहे, करिना कपूरने सैफ अली खानसोबत ऑक्टोबर २०१२ मध्ये विवाह केला, तेव्हापासून करिना ही निशाण्यावर आहे.

Updated: Jan 30, 2015, 07:04 PM IST
'करिनाला मुस्लिम बनवलेलं नाही' : सैफ अली खान title=

मुंबई : करिना कपूर काही धार्मिक संघटनांच्या निशाण्यावर आहे, करिना कपूरने सैफ अली खानसोबत ऑक्टोबर २०१२ मध्ये विवाह केला, तेव्हापासून करिना ही निशाण्यावर आहे.

करिनाला लव जिहाद प्रकरणात पोस्टर गर्ल सारखंही दाखवण्यात आलं.  यावर बोलतांना सैफ अली खानने म्हटलंय, ४४ वर्षीय अभिनेता सैफ अली खानने म्हटलं आहे की, "काही लोकांना असं वाटतंय की, मी करिनाला मुस्लिम बनवलंय. नाही करिनाला मुस्लिम बनवण्यात आलेलं नाही, अशा गोष्टी भावनात्मक, बौद्धिक आणि सामाजिक स्तरावर टिकत नाहीत".

सैफ पुढे बोलतांना म्हणाला,  करिनाने सिनेमात योगदान दिलंय, सामाजिक योगदानही करिनाने दिलं आहे, त्याचा गर्व असला पाहिजे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.