करीना-सैफच्या तैमूरचा नवा फोटो व्हायरल

अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तैमूर जन्मापासूनच चर्चेत आहे. तैमूर त्याच्या नव्या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2017, 11:53 AM IST
करीना-सैफच्या तैमूरचा नवा फोटो व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तैमूर जन्मापासूनच चर्चेत आहे. तैमूर त्याच्या नव्या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 तैमूरचे अनेक फोटो यापूर्वी सोशल मीडियावर शेअर झाले होते. पण छोट्या नवाबचा आता जो फोटो समोर आला आहे, या फोटोत तैमूर अतिशय स्मार्ट दिसतोय.

सैफने तैमूरचा हा फोटो त्याच्या व्हॉट्सअॅप डीपीवर लावल्याचं कळतं. पण यानंतर हा फोटो व्हायरल झाला आहे. करड्या रंगाचे डोळे, सोनेरी केस, असा तैमूरचा एक क्यूट फोटो व्हायरल होत आहे. 

तैमूर गोंडस मुलगा आहे. हे करीना काही दिवसांपूर्वीच म्हणाली होती, मात्र आता हा फोटो पाहून हे म्हणता येईल.

सैफ आणि करीनाने मुलाचं नाव तैमूर अली खान ठेवल्याने सोशल मीडियावर दोघांवर जोरदार टीका झाली होती. याआधी तैमूरच्या नावावर फारच वाद झाला होता.