कतरिना - रणबीर पुन्हा दिसले एकत्र

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपला आता जवळपास वर्ष झालंय... दोघांनीही आपल्या ब्रेकअपबद्दल थेट नसलं तरी अनेकदा बोलूनही दाखवलंय. पण, ही जोडी नुकतीच पुन्हा एकत्र दिसली... आणि त्यांच्या फॅन्सनाही त्याचा आनंद झाला. 

Updated: May 10, 2017, 07:05 PM IST
कतरिना - रणबीर पुन्हा दिसले एकत्र title=

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपला आता जवळपास वर्ष झालंय... दोघांनीही आपल्या ब्रेकअपबद्दल थेट नसलं तरी अनेकदा बोलूनही दाखवलंय. पण, ही जोडी नुकतीच पुन्हा एकत्र दिसली... आणि त्यांच्या फॅन्सनाही त्याचा आनंद झाला. 

अनेकदा ब्रेक अप झाल्यानंतर लोक एकमेकांकडे दुर्लक्षच करताना दिसतात. परंतु, निर्माता अनुराग बसू यांच्या वाढदिवसानिमित्तानं मात्र रणबीर - कतरिना पुन्हा एकत्र आले. 

#RanbirKapoor and #KatrinaKaif celebrate @anuragsbasu 's birthday! HAPPY BDAY DADA Bring us #JaggaJasoos soon!

A post shared by Ranbir-Katrina Forever (@ranbirkatrinaforever) on

उल्लेखनीय म्हणजे, लवकरच रणबीर आणि कतरिना यांचा 'जग्गा जासूस' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केलंय.

अनुराग यांच्या 43 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं कतरिना आणि रणबीर यांनी एकत्र येत त्याला केक भरवून शुभेच्छा दिल्या. 

काही दिवसांपूर्वीदेखील रणबीर कपूर आणि कतरिना कैफ आपलं शूटिंग संपल्यानंतर स्टुडिओतून बाहेर पडताना एकमेकांच्या हातात हात घालून बाहेर पडताना दिसले होते. हा फोटो अनुराग बसू यांनीच शेअर केला होता. 

Happy birthday to you ... happy birthday to you ... happy birthday dear dada .. happy birthday to you .

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

हा सिनेमा तयार होण्यासाठी जवळपास चार वर्षांचा कालावधी लागलाय. यापूर्वी हा सिनेमा 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार हेता. परंतु, काही कारणास्तव त्याचं प्रदर्शन लांबलं.