अबब! आता कतरिना कैफ बेपत्ता झाली!

राहुल गांधी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लागले आहेत, तर दुसरीकडे आता कतरिना कैफ हरविल्याची चर्चा आहे. ट्विटरवर #KatrinaMissing सध्या टॉप ट्रेंडिगमध्ये आहे. 

Updated: Mar 23, 2015, 07:07 PM IST
अबब! आता कतरिना कैफ बेपत्ता झाली! title=

मुंबई: राहुल गांधी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लागले आहेत, तर दुसरीकडे आता कतरिना कैफ हरविल्याची चर्चा आहे. ट्विटरवर #KatrinaMissing सध्या टॉप ट्रेंडिगमध्ये आहे. 

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील नगर कोतवालीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी बेपत्ता असल्याचं पोस्टर लागलंय. ज्यावर राहुल गांधींना शोधून देणाऱ्यांना योग्य बक्षीस देण्यात येईल, असंही लिहिलंय. या पोस्टरचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला गेलाय. ज्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफबद्दलही विचारलं गेलंय. हा केवळ नुसता योगायोग आहे. 

कतरिनाच्या असंख्य फॅन्सची ती बेपत्ता असल्यानं चिंता व्यक्त केलीय. तर अनेक जणांना नेमकं घडलं काय? हे जाणून घ्यायचंय. 

राहुल गांधी सुट्टीवर गेल्यानंतर सोशल मीडियावर लोकं आपआपल्या पद्धतीनं रिअॅक्ट होत आहेत. आता कतरिना कैफ बेपत्ता असल्याचा ट्रेंड सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.