त्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरून कतरिनाला डच्चू

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप होऊन आता बराच काळ झाला आहे.

Updated: Apr 14, 2016, 07:19 PM IST
त्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरून कतरिनाला डच्चू title=

मुंबई: कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप होऊन आता बराच काळ झाला आहे. इतकच काय आता तर कतरिनाला कपूर कुटुंबाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरूनही डच्चू देण्यात आला आहे. 

स्पॉटबॉय डॉट कॉम या वेबसाईटनं हा दावा केला आहे. रणबीरची काकू रितू नंदानं कतरिनाला या ग्रुपवरून काढून टाकल्याचंही बोललं जात आहे. कतरिनाला कपूर कुटुंबियांच्या या ग्रुपमधून काढून टाकल्यावर ऋषी कपूर यांना या ग्रुपवर टाकल्याचंही या वेबसाईटचं म्हणणं आहे. 

रणबीर आणि कतरिना हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते, पण दोघांमध्येही खटके उडायला सुरुवात झाल्यानं वेगळं व्हायचा निर्णय घेतल्याचा बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.