कॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला

रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. पण याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा अजून करण्यात आलेला नाही. पण दोघेही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करत असतात.

Updated: Feb 6, 2016, 01:52 PM IST
कॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. पण याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा अजून करण्यात आलेला नाही. पण दोघेही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करत असतात.

कॅटरिनाला एका टीव्ही इंटरव्यूव्ह मध्ये तिच्या ब्रेकअप बद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा कॅटरिना म्हणते की,'' ब्रेकअप ? कोणता ब्रेकअप. कोणी म्हटलं की माझा ब्रेकअप झाला. मी कधी असं ही नाही म्हटलं की मी कोणासोबत रिलेशनशिप मध्ये आहे.''

जेव्हा तिला विचारण्यात आलं की तु व्हॅलेंटाईन्स डे कोणासोबत साजरा करणार आहे तर, कॅटरिना म्हणाली की, फितूरच्या सहकलाकार तब्बू हिच्यासोबत. येत्या १२ फेब्रुवारीला आदित्य रॉय कपूर, कॅटरिना कॅफ यांचा फितूर हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे कॅटरिना सध्या त्यामध्ये बिझी आहे.