मला हवीयेत मुलं आणि नातवंडं, कतरिनाने व्यक्त केली इच्छा

मुंबई : गेले काही दिवस कतरिना कैफ रणबीरसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत राहिली आहे. 

Updated: Feb 18, 2016, 01:45 PM IST
मला हवीयेत मुलं आणि नातवंडं, कतरिनाने व्यक्त केली इच्छा title=

मुंबई : गेले काही दिवस कतरिना कैफ रणबीरसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत राहिली आहे. यादरम्यान प्रदर्शित झालेल्या तिच्या 'फितूर' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर काही कमाल केली नाही.

नुकतीच तिने बॉलिवूडलाईफ डॉट कॉम या वेबसाईटला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने आपल्याला आता मुलं हवीयेत तसंच तसेच वयाच्या साठाव्या वर्षी तिला नातवंड पाहण्याचीही इच्छा असल्याचे म्हटलेय. 

'मला माझ्या अवतीभोवती मित्र मैत्रीणी हवे आहेत. काही लहान गोंडस मुलंही आवडतील... आणि नातवंडं सुद्धा. बाप रे! माझ्या खूपच इच्छा आहेत. मला आता घाई करायला हवी,' असे कतरिना म्हणाली.