CID बोलणार.. दया दरवाजा तोड गं...!

 गेली सोळा वर्षे 'सोनी वाहिनी'वरील 'सीआयडी' या मालिकेचे 'दया दरवाजा तोड दो' या संवादाचे महत्व अजून कायम आहे. पण लवकरच या संवादातील दयाची जागा जयवंती शिंदे ही मराठमोळी सीआयडी अधिकारी घेणार आहे. आपल्या टॉमबॉय लुकसाठी प्रसिद्ध असलेली तान्या अब्रोल सीआयडीमध्ये लवकरच 'लेडी दया'च्या भूमिकेत येणार आहे. दर आठवडय़ाला गुंतागुंतीचा गुन्हा आपल्या खास शैलीमध्ये सोडवण्यासाठी प्रसिद्ध आसलेल्या एसीपी प्रद्युम्नच्या गटामध्ये एका नवीन कायमस्वरूपी अधिकाऱ्याची भर पडणार आहे. जयवंती शिंदे नावाची ही मराठमोळी अधिकारी असली तरी, निर्भया आहे.

Updated: Nov 26, 2014, 07:34 PM IST
CID बोलणार.. दया दरवाजा तोड गं...! title=

मुंबई :  गेली सोळा वर्षे 'सोनी वाहिनी'वरील 'सीआयडी' या मालिकेचे 'दया दरवाजा तोड दो' या संवादाचे महत्व अजून कायम आहे. पण लवकरच या संवादातील दयाची जागा जयवंती शिंदे ही मराठमोळी सीआयडी अधिकारी घेणार आहे. आपल्या टॉमबॉय लुकसाठी प्रसिद्ध असलेली तान्या अब्रोल सीआयडीमध्ये लवकरच 'लेडी दया'च्या भूमिकेत येणार आहे. दर आठवडय़ाला गुंतागुंतीचा गुन्हा आपल्या खास शैलीमध्ये सोडवण्यासाठी प्रसिद्ध आसलेल्या एसीपी प्रद्युम्नच्या गटामध्ये एका नवीन कायमस्वरूपी अधिकाऱ्याची भर पडणार आहे. जयवंती शिंदे नावाची ही मराठमोळी अधिकारी असली तरी, निर्भया आहे.
'चक दे' चित्रपटातील आपल्या पंजाबी मुलीच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी तान्या अब्रोल ही भूमिका साकारणार असून सध्या ती भूमिकेसाठी लढण्याचे प्रशिक्षण घेत आहे.
मालिकेमध्ये ती इतर पुरुष कलाकारांसोबत हाणामारी करताना, गुंडाशी चार हात करताना इतकेच नव्हे, तर बंद दरवाजे पण तोडेल. या मालिकेमध्ये याआधी ही सर्व कामे दया करत असे. त्यामुळे हिला 'सीआयडी'मधील 'लेडी दया' या नावाने ओळखले जाणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.