AIB च्या त्या व्हिडिओवर लता दीदी बोलल्या

AIB च्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लिल भाषेमध्ये विडंबन करण्यात आलं आहे.

Updated: May 31, 2016, 03:45 PM IST
AIB च्या त्या व्हिडिओवर लता दीदी बोलल्या title=

मुंबई :  AIB च्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लिल भाषेमध्ये विडंबन करण्यात आलं आहे. या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तन्मय भट विरोधात सगळेच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. हा व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकण्यात यावा अशी मागणीही होत आहे. 

या वादावर अखेर लता मंगेशकर यांनी मौन सोडलं आहे. मी हा व्हिडिओ पाहिला नाही आणि पाहायचीही इच्छा नाही. मला यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं लता दीदी म्हणाल्या आहेत. तन्मय भट कोण आहे हे मला माहिती नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.