व्हिडिओ : 'लिंगा'मध्ये पाहा रजनीचा डबल धमाका

सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धम्माल उडवून देण्यासाठी सज्ज झालाय. 

Updated: Nov 18, 2014, 09:19 AM IST
व्हिडिओ : 'लिंगा'मध्ये पाहा रजनीचा डबल धमाका title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धम्माल उडवून देण्यासाठी सज्ज झालाय. 

रजनीकांतचा आगामी सिनेमा ‘लिंगा’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. ‘लिंगा’मध्येही रजनीकांत डबल रोलमध्ये दिसणार आहे.

या सिनेमात रजनीकांतसोबत सोनाक्षी सिन्हादेखील दिसणार आहे. जगपति बापू आणि अनुष्का शेट्टी यांनीही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका निभावल्यात.

या सिनेमाला संगीत दिलंय ए. आर. रेहमान यांनी... हा सिनेमा १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

रजनीकांतच्या फॅन्सना त्याच्या या सिनेमाची आतूरतेनं वाट पाहत असतील. ‘लिंगा’मध्ये त्यांना अॅक्शनची मेजवानीच मिळणार आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.