अमिताभ नाही तर ही अभिनेत्री असणार कोन बनेगा करोडपतीची होस्ट

कौन बनेगा करोडपतीचं होस्ट आता कोण करणार...

शैलेश मुसळे | Updated: May 19, 2017, 08:37 AM IST
अमिताभ नाही तर ही अभिनेत्री असणार कोन बनेगा करोडपतीची होस्ट

मुंबई : कौन बनेगा करोडपतीचं नाव घेतलं की अमिताभ बच्चन समोर येतात. अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या ८ सीजनपैकी ७ सीजन होस्ट केले आहेत. त्यापैकी फक्त एक सीजनमध्ये शाहरुख खान ने होस्टींग केलं होतं.

आता पुन्हा एकदा केबीसीच्या छोट्या परद्यावर मोठ्या घरची बहु दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या जागी आता ऐश्वर्या राय बच्चन ही होस्टींग करणार असल्याचं बोललं जातंय. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार यंदा अमिताभ यांच्या जागी त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन शो होस्ट करु शकते. पण या बाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. माधुरी दिक्षीतचं नाव देखील यासाठी चर्चेत आहे. यो दोघांशी या बाबत बोलणी देखील झाल्याचं या वृत्तपत्राने म्हटलं आहे.