'मद्रास कॅफे'फेम अभिनेत्रीला लिव्ह इन पार्टनरसोबत अटक

'मद्रास कॅफे' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसलेली अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर चंद्रशेखर यांना मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Jun 2, 2015, 12:54 PM IST
'मद्रास कॅफे'फेम अभिनेत्रीला लिव्ह इन पार्टनरसोबत अटक title=

नवी दिल्ली : 'मद्रास कॅफे' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसलेली अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर चंद्रशेखर यांना मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

जवळपास 10 करोड रुपयांना चुना लावणाऱ्या या जोडीवर मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. 

लीना आणि शेखरनं एक बनावट गुंतवणूक कंपनी उघडली होती. गुंतवणुकदारांना कमीत कमी वेळात दहा पट रक्कम देण्याचं आश्वासन ते देत होते. विश्वास जिंकण्यासाठी ते लोकांना बँक फिक्स्ड डिपॉझिटसारखीच पावतीही देत होते.

पण, जेव्हा गुंतवणूकदार पावती घेऊन आपले पैसे परत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे गेले तेव्हा मात्र या दोघांनी टाळाटाळ सुरू केली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या जोडगोळीनं आत्तापर्यंत 10 करोड रुपयांचा घोटाळा केलाय. या प्रकरणात पोलीस चौकशीत आणखी काही जणांनी नावं समोर आलीत.

या दोन आरोपींकडून 137 परदेशी मनगटी घड्याळं आणि 7 महागड्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्यात. हे दोघे गोरेगावच्या एका पॉश भागात राहत होते. त्यांच्या फ्लॅटचं आणि ऑफिसचं महिन्याचं भाडंच जवळपास लाख रुपये आहे.

कोण आहे लीना पॉल...
बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा 'मद्रास कॅफे' या सिनेमात दिसलेली लीना मूळची केरळची... तिनं मल्याळम सिनेमा 'रेड चिलीज'मध्ये मोहनलालसोबतही काम केलंय. लीनाचे वडील दुबईत असतात. 

लीनानं डॉक्टरकीचं शिक्षण घेतलंय. पण, 2011 मध्ये बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी ती भारतात आली. मॉडेलिंग करताना तिला मल्याळम सिनेमाची ऑफर मिळाली. 

यापूर्वीही, लीना आणि शेखरनं तमिळनाडूमध्ये कॅनरा बँकेला जवळपास 19 करोड रुपयांचा चुना लावला होता. 2013 मध्ये दिल्लीच्या एका फार्महाऊसमधून तिला अटक करण्यात आली होती. त्या फार्महाऊसचं भाडंच चार लाख रुपये महिना होतं. 

याच वर्षी शेखरनं आपण आयएसएस अधिकारी असल्याचं भासवत एक व्यक्तीकडून प्रोजेक्टसाठी 76 लाख रुपये उकळले होते... लिनानं त्याच्या पत्नीची भूमिका पार पाडली होती. पण, हा प्रोजेक्ट कधी सुरू झालाच नाही... ना गुंतवणुकदाराला त्याचे पैसे परत मिळाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.