राजकुमार संतोषीच्या आगामी सिनेमात मनीषा कोइराला

कॅन्सरसारख्या आजारातून नुकतीच बाहेर पडलेली अभिनेत्री मनीषा कोइराला लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपट निर्माता राजकुमार संतोषीच्या सिनेमात ती दिसणार आहे. मनीषा आता तंदुरुस्त असल्याचं प्रबंधक सुब्रतो घोष यांच्याकडून कळतंय.

Updated: Oct 1, 2014, 05:36 PM IST
राजकुमार संतोषीच्या आगामी सिनेमात मनीषा कोइराला title=

मुंबई : कॅन्सरसारख्या आजारातून नुकतीच बाहेर पडलेली अभिनेत्री मनीषा कोइराला लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपट निर्माता राजकुमार संतोषीच्या सिनेमात ती दिसणार आहे. मनीषा आता तंदुरुस्त असल्याचं प्रबंधक सुब्रतो घोष यांच्याकडून कळतंय.

मनीषाला या सिनेमाची कथा तिला प्रचंड आवडली असून संतोषींच्या सिनेमात काम करण्याचं तिनं ठरवलंय. सर्व व्यवस्थित असलं तर जानेवारी 2015मध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. मनीषा या सिनेमात मुख्य भूमिकेत असून अभिनेता पंकज कपूर हे सुद्धा महत्त्वाची भूमिका साकाराताना दिसेल.

या आधी सुद्धा तिनं राजकुमार संतोषीच्या 2001मध्ये आलेल्या 'लज्जा' सिनेमात काम केलं होतं. संतोषी यांचा हा सिनेमा त्यांच्या इतर सिनेमापेक्षा खूप वेगळा असल्याचं सांगितलं जातंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.