राधिकाने गुरुनाथ, अथर्वसह उभारली आनंदाची गुढी

माझ्या नव-याची बायको ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे. शनायाला शह देण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका कसोशीने प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे. 

Updated: Mar 24, 2017, 05:59 PM IST
राधिकाने गुरुनाथ, अथर्वसह उभारली आनंदाची गुढी title=

मुंबई : माझ्या नव-याची बायको ही मालिकाही आता रंजक वळणावर आली आहे. शनायाला शह देण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका कसोशीने प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे. 

कोणताही सण किंवा समारंभ असो तो कुटुंबासमवेत साजरा करणे हा राधिकाचा स्वभाव. जरी शनाया राधिकाच्या हक्काच्या घरात ठाण मांडून बसली असली तरी हा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आपल्याच घरात साजरा करणार असा निर्णय राधिका घेते. 

गुढीपाडव्याच्या दिवशी छान सजून राधिका घरी पोचते आणि गुरुनाथलाही यासाठी तयार करते. यावेळी नेहमीप्रमाणे शनाया विरोध करते परंतु राधिका तिच्याकडे दुर्लक्ष करत गुरुसोबत ही गुढी उभारते.