मीरा राजपूतचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

Last Updated: Monday, March 20, 2017 - 17:27
मीरा राजपूतचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत तिच्या वादग्रस्त विधानामुळे वादात अडकलीये. आंतरराष्ट्रीय महिला दिनी तिने केलेल्या एका विधानामुळे वाद ओढवून घेतलाय.

रोज कामाला जाणाऱ्या महिला आपल्या मुलांना पपीसारखं (कुत्र्याच्या पिलासारखं) वागवतात, असं वादग्रस्त विधान तिनं केलं होतं. त्यामुळे बऱ्याच लोकांनी तिच्यावर टीकेची झो़ड उठवली. 

सोशल मीडियावरही अनेक जणांनी तिला ट्रोल केलं होतं. नंतर तिने आपली चूक मान्य करत वेगवेगळी स्पष्टीकरणंही दिली होती मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

याच वादात तिच्या जुन्या क्लासमेटनेही उडी घेतली आहे. तिने मीराला जुन्या विचारांची आणि संकुचित मनोवृत्तीची म्हटलंय. एका पोस्टद्वारे  तिने मीराच्या स्वभावाविषयी भाष्य केलंय. मीरा मुलींना त्यांच्या कपडे, फॅशन सेन्स आणि फिटनेसवरून जज करायची , असं मीराच्या क्लासमेटने म्हटलंय. 

'तुझी मुलाखत पाहून मला तुझा राग आला. मी तुझ्या कॉलेजमध्ये आणि बॅचमध्ये तीन वर्ष घालवली आहेत आणि त्यामुळे तुझी स्त्रियांविषयीची दृष्टी संकुचित असल्याचं मी ठामपणे सांगु शकते. तु कॉलेजमध्ये तुझ्या ग्रुपसोबत फिरायचीस आणि ज्या मुली तुझ्या फॅशन स्टॅंडर्डला शोभत नसत , त्यांना तु तुच्छ मानायचीस. हे वागणं तुझी संकुचित वृत्ती दाखवतं, असं तिने फेसबुक पोस्टवर म्हटलंय. 

First Published: Monday, March 20, 2017 - 17:17
comments powered by Disqus