अजान वादात मिकाची उडी, सोनू निगमला दिला हा सल्ला!

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, April 20, 2017 - 10:45
अजान वादात मिकाची उडी, सोनू निगमला दिला हा सल्ला!

मुंबई : गायक सोनू निगम याच्या वादग्रस्त ट्विटनंतर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, सोनू आपल्या ट्विटवर कायम आहे. आता या वादात गायक मिका सिंग याने उडी घेतली आहे. मी सोनूची इज्जत करतो. जर भोंग्यांचा त्रास होत असेल तर त्यांने आपले राहते घर बदलले पाहिजे, असा सल्ला मिराने दिलाय.

मिकाने सल्ला देतना ट्विट केलेय. मी मोठ्या भावाप्रमाणे आपली इज्जत करतो. जर तुला अजानचा त्रास होत असलेल तर तू आपले राहते घर बदलायला हवे.

याला उत्तर देताना सोनू म्हणाला लाऊडस्पीकरवर मी मत व्यक्त केलेय. मी मंदिर आणि मशिद याबाबतही बोललोय. तर मिकाने ट्विटमध्ये लिहिले आहे मंदिर, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये मिळणारे जेवण, प्रसात, लंगर चांगले असते. केवळ ते लाऊडस्पीकरसाठी ओळखले जात नाही. ते सन्मानजनक गोष्ट आहे. येथे दान सुद्धा केले जाते.

पहाटे देण्यात येणाऱ्या अजानमुळे झोपमोड होते, असे ट्विट सोनू निगमने केले होते. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त उमटल्यात. त्यानंतर त्याने मंदिर, गुरुद्वारा, चर्चवरील लाऊडस्पीकरवर भाष्य केले. त्यानंतर मिकाने त्याला घर बदलण्याचा सल्ला दिलाय.

 

First Published: Thursday, April 20, 2017 - 10:45
comments powered by Disqus