१०० कोटींच्या पुढे एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी

क्रिकेटर एमएस धोनी यांच्या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर जोरदार फटकेबाजी करत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. धोनी द अनटोल्ड स्टोरीने १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Updated: Oct 9, 2016, 02:33 PM IST
१०० कोटींच्या पुढे एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी  title=

मुंबई : क्रिकेटर एमएस धोनी यांच्या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर जोरदार फटकेबाजी करत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. धोनी द अनटोल्ड स्टोरीने १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

सिनेमाने पहिल्या आठवड्यात म्हणजे गुरुवारपर्यंत ९४ कोटींची कमाई केली होती. 

'धोनी द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा ३० सप्टेंबर रोजी रिलीज झाला होता. दुसऱ्या आठवड्याला या बायोपिकने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.