प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या : बॉयफ्रेंड राहुलला कोर्टाची चपराक

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Updated: Apr 7, 2016, 02:08 PM IST
प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या : बॉयफ्रेंड राहुलला कोर्टाची चपराक title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. कोर्टानं राहुलचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय.

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमुळे केवळ मनोरंजनाची दुनियाच हादरली नाही तर तचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगलाही या घटनेमुळे जबरदस्त मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. प्रत्युषाच्या कुटुंबीयांनी राहुलविरोधात तक्रार दाखल केली आहे.

राहुलने दिंडोशी न्यायालयात  अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावला आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येसाठी राहुल जबाबदार असल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी राहुलचा वकील नीरज गुप्ता याने या खटल्यातून आता अंग काढून घेतलं आहे. राहुलने आपल्याला 'अंधारात ठेवलं' असा आरोप त्याने केला आहे. यामुळे राहुलच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'मानवी दृष्टीकोनातून मी या खटल्यातून बाहेर पडत आहे. मला वाटलं मी हा खटला लढू नये, माझ्यामुळे कोणावरही अन्याय व्हावा असं मला वाटत नाही,' असं नीरज यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलंय.