नागराज मंजुळेचा शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे पाठोपाठ आता दिग्दर्शक नागराज मंजुळेनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केलाय.

Updated: Jun 19, 2016, 09:12 AM IST
नागराज मंजुळेचा शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात title=

मुंबई : नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे पाठोपाठ आता दिग्दर्शक नागराज मंजुळेनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केलाय.

'सैराट' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ८५ कोटींच्यावर गल्ला जमवला आहे. त्यामुळे नागराज मंजुळेनं यातील काही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचं ठरवलंय. 

शेतकऱ्यांना फक्त पैसे देऊन मदत न करता इतर गोष्टींचे वेगवेगळे प्रयोगदेखील नागराज करणार असल्याचं कळतंय.