नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितलं कोणत्या धर्माचा आहे त्याचा डीएनए

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहनत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या नंदिता दास यांच्या 'मंटो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

Updated: Apr 24, 2017, 03:15 PM IST
नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितलं कोणत्या धर्माचा आहे त्याचा डीएनए title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहनत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या नंदिता दास यांच्या 'मंटो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

सोमवारी सकाळी एक व्हिडियो संदेशच्या माध्यमातून नवाजने सांगितलं की, त्यांनी त्यांचा डीएनए टेस्टे केला आणि रिपोर्टमध्ये अनेक धर्माचे मिळून ते १०० टक्के कलाकार बनले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

नवाजुद्दीनने सांगितलं की, ते काही टक्के हिंदू, काही टक्के मुस्लिम, काही टक्के सिख आणि बुद्धिस्ट आहेत. प्रत्येकाने यातून काहीतरी घेण्यासारखं आहे.

पाहा व्हिडिओ