टिपू सुल्तानची भूमिका करु नका, सुपरस्टार रजनीकांतला इशारा

सुपरस्टार रजनीकांतला तामिळनाडूतील भाजप नेते एल. गणेशन यांनी इशारा दिलाय. टिपू सुल्तान यांच्यावरील चित्रपटात भूमिका न करण्याचा इशारा रजनीकांत यांना दिला गेलाय. टिपू सुलतान हा हिंदू आणि तामिळ विरोधी राजा होता, अशा व्यक्तीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. 

Updated: Sep 14, 2015, 10:26 PM IST
टिपू सुल्तानची भूमिका करु नका, सुपरस्टार रजनीकांतला इशारा title=

चेन्नई: सुपरस्टार रजनीकांतला तामिळनाडूतील भाजप नेते एल. गणेशन यांनी इशारा दिलाय. टिपू सुल्तान यांच्यावरील चित्रपटात भूमिका न करण्याचा इशारा रजनीकांत यांना दिला गेलाय. टिपू सुलतान हा हिंदू आणि तामिळ विरोधी राजा होता, अशा व्यक्तीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. 

सध्या कन्नड सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी टिपू सुल्तान यांच्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु केली असून या चित्रपटासाठी तामिळमधील सुपरस्टार रजनीकांत यांना विचारणा करण्यात आली आहे. रजनीकांत यांनी या चित्रपटावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी हिंदूत्ववादी संघटनांनी आत्तापासूनच चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. भाजपाचे तामिळनाडूतील नेते एन. गणेशन यांनी रजनीकांत यांनी हा चित्रपटच स्वीकारु नये असा इशारावजा विनंतीच केली आहे. 

आणखी वाचा - ट्विटरवर रजनीकांत... आता ट्विटर करणार रजनीला फॉलो

भाजपासोबतच आता इतर हिंदूत्ववादी संघटनांनीही रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारु नये असा इशारा दिला आहे. त्यावरून आता नवा वाद सुरू झालाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.