यू-ट्यूबवर म्युझिक कॅटगरीत मराठी गाण्याची बाजी

उर्फी या मराठी सिनेमातलं गाणं 'ओ मारिया, माझी मोनालिसा, मी बावरा का झालो रे असा', हे गाणं यू-ट्यूबवर म्युझिक कॅटेगरीत व्हायरल होतंय.

Updated: Oct 31, 2015, 11:33 AM IST
यू-ट्यूबवर म्युझिक कॅटगरीत मराठी गाण्याची बाजी title=

मुंबई : उर्फी या मराठी सिनेमातलं गाणं 'ओ मारिया, माझी मोनालिसा, मी बावरा का झालो रे असा', हे गाणं यू-ट्यूबवर म्युझिक कॅटेगरीत व्हायरल होतंय.

शांताबाईनंतर ओ मारिया गाण्याने यू-ट्यूबवर बाजी मारली आहे, या गाण्याआधी काही दाक्षिणात्य चित्रपटांनी नंबर पटकावला होता.

मात्र 'ओ मारिया' गाण्याने त्यांनाही मात दिली आहे. ओ मारिया हे गाणं वेगाने यू-ट्यूबवर पुढे येतंय, पण या गाण्याआधी मराठी गाणं शांताबाई आहे.

शांताबाईला हे गाणं मागे टाकेल का? या कडे अनेकांचं लक्ष लागून आहे. या आधी या चित्रपटातलं धनक-धनक गाणं लोकप्रिय झालं होतं.

पाहा उर्फी चित्रपटातलं गाणं 'ओ मारिया'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.