पूनमचा हिरो बनण्यासाठी 25 हजार जण उत्सुक

विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पूनम पांडेच्या आगामी 'हेलन' या सिनेमातील अभिनेता शोधण्यासाठी चक्क 'कौन बनेगा पूनम का हिरो' असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय

Updated: May 28, 2015, 06:00 PM IST
पूनमचा हिरो बनण्यासाठी 25 हजार जण उत्सुक title=

मुंबई : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पूनम पांडेच्या आगामी 'हेलन' या सिनेमातील अभिनेता शोधण्यासाठी चक्क 'कौन बनेगा पूनम का हिरो' असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. आश्चर्यकारक म्हणजे, या कार्यक्रमात जवळपास २५,००० लोकांनी सहभाग नोंदवलाय, अशी माहिती सिनेमाचे निर्माते सुरेश नकुम यांनी दिलीय. 

नकुम यांच्या म्हणण्यानुसार, ज्याप्रकारे 'कौन बनेगा पूनम का हिरो' कार्यक्रमाला प्रतिसाद मिळताना दिसतोय तो आमच्या सर्वांसाठी सुखद धक्काच आहे. बॉलिवूडमध्ये सिनेमाची शूटींग सुरू होण्यापूर्वी एखाद्या सिनेमाला अशा प्रतिक्रिया मिळाल्याचं मी आजवर तरी पाहिलेलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.  

पूनमचा 'हिरो' बनण्यासाठी तिच्या २५ हजार फॅन्सनी त्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप अपलोड केल्या आहेत, यावरून तरुणांमध्ये पूनमची किती 'क्रेझ' आहे हे लक्षात येतंच आहे... असो... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.