शेफालीच्या लग्नाच्या बातमीनं तरुणांना 'कांटा लगा...'

‘कांटा लगा...’ म्हणत एका आयटम साँगद्वारे चर्चेत आलेली शेफाली जरीवाला आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. शेफाली नुकतीच विवाह बंधनात अडकल्याचं समजतंय. 

Updated: Aug 19, 2014, 12:12 PM IST
शेफालीच्या लग्नाच्या बातमीनं तरुणांना 'कांटा लगा...' title=

मुंबई : ‘कांटा लगा...’ म्हणत एका आयटम साँगद्वारे चर्चेत आलेली शेफाली जरीवाला आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. शेफाली नुकतीच विवाह बंधनात अडकल्याचं समजतंय. 

गेल्या मंगळवारी शेफालीनं तिचा प्रियकर पराग त्यागी याच्यासोबत कोर्ट मॅरेज केल्याचं सांगितलं जातंय. यामुळे, शेफालीच्या अदांवर घायाळ झालेल्या कित्येकांची हृदय तुटले असतील, यात शंका नाही.   

शेफाली आणि पराग गेल्या कित्येक दिवसांपासून लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होते. पराग सध्या झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘जोधा-अकबर’ या कार्यक्रमात शरीफुद्दीनची भूमिका निभावताना दिसतोय. 
खुद्द शेफालीनं या बातमीला दुजोरा देत ‘पराग आणि मी मंगळवारी कोर्ट मॅरेज केलंय’ असं म्हटलंय. परागनं तीन वर्षांपूर्वीच आपल्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, पण आम्ही फायनली आत्ता लग्न केलंय... आणि आम्ही खूप आनंदी आहोत, असंही शेफालीनं म्हटंलय.

आपले कुटुंबीयही आपल्या लग्नाच्या बातमीनं आश्चर्यचकीत झाल्याचं शेफालीनं म्हटलंय. शेफालीचे कुटुंबीय साऊथ आफ्रिकेत असतात, तर परागचे दिल्लीत... ‘आम्ही प्रॅक्टीकल निर्णय घेत कोर्ट मॅरेज घेतलं... यावेळी आम्ही दोघेच होतो... हे सगळं इतक्या घाईघाईत झालं की आम्हाला एक फोटोही काढता आला नाही’ असंही शेफालीनं म्हटलंय. 

2002 मध्ये आलेल्या ‘कांटा लगा...’ या म्युझिक व्हिडिओमधून चर्चेत आली होती. त्यानंतर ती 2004 मध्ये आलेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या सिनेमात बिजलीच्या भूमिकेतही दिसली होती.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.