पाहा : 'पीके'च्या दुसऱ्या पोस्टरवरून ट्रान्झिस्टरही गायब!

‘पीके’ या आमिर खानच्या बहुचर्चित सिनेमाचं दुसरं पोस्टर आज जाहीर करण्यात आलंय.

Updated: Aug 20, 2014, 05:19 PM IST


 

मुंबई : ‘पीके’ या आमिर खानच्या बहुचर्चित सिनेमाचं दुसरं पोस्टर आज जाहीर करण्यात आलंय.

‘आपल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरही नसेल’ असं आमिरनं म्हटलेलं या पोस्टरमध्ये तंतोतंत खरं ठरलंय. आमीरच्या या पोस्टरमध्ये कुठेही ट्रान्झिस्टर दिसत नाहीय. पण, आमिरच्या या पोस्टरला कुणीही अश्लील मात्र म्हणणार नाही, हेही नक्की

‘पीके’ या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये आमिरच्या अंगावर कोणतचं वस्त्र नव्हतं. आपलं अंग झाकण्यासाठी त्यानं केवळ एका ट्रान्झिस्टरची मदत घेतली होती... त्यामुळे पोस्टरवर वादही निर्माण झाला होता. 

या वादाला आमिरनं हास्यात उडवून लावत खट्याळ आमिरनं ‘पीकेच्या पुढच्या पोस्टरवर ट्रान्झिस्टरही नसेल’ असं म्हटलं होतं. 

 

 

व्हिडिओमध्ये पाहा : काय म्हणतोय 'पीके' ट्रान्झिस्टरवाला... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.