पूजा भट्टच्या ‘कॅबरे’मध्ये दिसणार श्रीसंत

 स्पॉट फिक्सिंगचे आरोपी क्रिकेटर एस. श्रीसंत क्रिकेट जगतापासून जरी दूर झाला असला तरी ग्लॅमर त्याची पाठ सोडत नाही. टीव्हीच्या जगतात तो प्रसिद्ध होता आता त्याचे पाऊले बॉलिवूडच्या दिशेने पुढे पडत आहेत. तो पूजा भट्टच्या आगामी ‘कॅबरे’ चित्रपटात दिसणार आहे. 

Updated: Nov 24, 2014, 07:00 PM IST
पूजा भट्टच्या ‘कॅबरे’मध्ये दिसणार श्रीसंत title=

नवी दिल्ली :  स्पॉट फिक्सिंगचे आरोपी क्रिकेटर एस. श्रीसंत क्रिकेट जगतापासून जरी दूर झाला असला तरी ग्लॅमर त्याची पाठ सोडत नाही. टीव्हीच्या जगतात तो प्रसिद्ध होता आता त्याचे पाऊले बॉलिवूडच्या दिशेने पुढे पडत आहेत. तो पूजा भट्टच्या आगामी ‘कॅबरे’ चित्रपटात दिसणार आहे. 

पूजा भट्टने एक फोटो पोस्ट केला, ज्यात श्रीसंत हा चित्रपट साइन केल्यानंतर आपल्या पत्नीसोबत केक कापत आहे. 
या चित्रपटात तो एका मेंटरची भूमिका निभावणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कौस्तव नारायण नियोगी करीत आहेत. आणि रिचा चड्ढा यात कॅबरे डान्सरच्या रोलमध्ये आपल्या दिसणार आहे. हा चित्रपट करण्यास श्रीसंतने होकार दिला आहे. 

यावर पूजा भट्टने सांगितले, की मी श्रीसंतला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटली. तो मल्याळी टोनमध्ये हिंदी बोलतो, मला या रोलसाठी तेच पाहिजे होते. सुरूवातीला आम्हांला वयस्क माणसाची गरज होती. पण श्रीसंतला पाहिल्यावर माझा प्लान बदलला. 

या श्रीसंत आपल्या लग्नाच्या लूकमध्ये असणार आहे, श्रीसंतला या चित्रपटात घेणे हे खूप मोठे यश आहे, असे पूजा भट्टने सांगितले. जे व्यक्ती श्रीसंतवर प्रेम करतात, ते हा चित्रपट पाहण्यास नक्की येतील. तसेच त्याचा जे द्वेष करतात ते देखील चित्रपट पाहायला येतील. तो आपल्या जीवनाच्या विचित्र वळणावर आहे, असेही पूजा भट्टने सांगितले.  

या चित्रपटाची शुटिंग जानेवारी २०१५ पासून सुरू होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.