'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण

लवकरच प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबत जेवताना दिसणार आहे. 

Updated: Apr 5, 2016, 12:36 PM IST
'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण title=

मुंबई : लवकरच प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबत जेवताना दिसणार आहे. 

होय, कारण अमेरिकन टीव्ही सीरिज 'क्वांटिको'ची स्टार अभिनेत्री प्रियांका चोपडा हिला नुकतंच बराक ओबामांकडून आपल्या शेवटच्या 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डटस डिनर'साठी आमंत्रण मिळालंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोपडा हीदेखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकते. या कार्यक्रमात प्रियांकाशिवाय हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपर, लूयी लियू, जेन फोंडा आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती दिसू शकतील. 

'व्हाईट हाऊस करस्पॉन्डटस डिनर'चा कार्यक्रम लॅरी विलमोर होस्ट करू शकतो. लॅरी 'द नाईटली शो विथ लॅरी विलमोर' होस्ट करतो. या कार्यक्रमात अनेक सरकारी अधिकारी सहभागी होऊ शकतात.