राहुल होणार प्रियंका चोप्राचा नवरा

राहुल बोस अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नवरा होणार आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना... अहो हे केवळ सिनेमात... 'दिल धडकने दो' झोया अख्तरचा नवा सिनेमा येतोय. 

Updated: Jun 25, 2014, 06:30 PM IST
राहुल होणार प्रियंका चोप्राचा नवरा title=

मुंबई: राहुल बोस अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नवरा होणार आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना... अहो हे केवळ सिनेमात...

'दिल धडकने दो' झोया अख्तरचा नवा सिनेमा येतोय. या सिनेमात अनेक प्रसिद्ध कलाकार आपल्याला एकत्र दिसतील. चित्रपटात रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, अनुष्का शर्मा, अनिल कपूरसारखे स्टार्स आहेत. आता राहुल बोसही यात सहभागी झालाय.

राहुल नुसता चित्रपटात आला नाही तर तो चक्क प्रियंकाच्या नवऱ्याच्या भूमिकेत आपल्याला दिसेल. सध्या या चित्रपटाचं शूटिंग जहाजावर सुरू आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.