असिनच्या पतीने शेअर केला रोमॅन्टिक फोटो

असिन आणि तिचा पती राहुल शर्मा हे दोघेगी खासगी जीवनाबाबत बोलणे कमी पसंत करतात. मात्र यावेळी असिनचा पती राहुल शर्माने ट्विटवरुन असिनप्रती असेलेले प्रेम जाहीर केलेय.,

Updated: Jan 29, 2016, 05:05 PM IST
असिनच्या पतीने शेअर केला रोमॅन्टिक फोटो title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : असिन आणि तिचा पती राहुल शर्मा हे दोघेगी खासगी जीवनाबाबत बोलणे कमी पसंत करतात. मात्र यावेळी असिनचा पती राहुल शर्माने ट्विटवरुन असिनप्रती असेलेले प्रेम जाहीर केलेय.

राहुलने मुंबईमध्ये झालेल्या लग्नसोहळ्यादरम्यान काढलेला एक फोटो शेअर केलाय. त्याचबरोबर एक मेसेजही लिहिलाय.

१९ जानेवारीला असिनचा विवाह मायक्रोमॅक्सचा संस्थापक राहुल शर्माशी झाला. खिलाडी स्टार अक्षय कुमार या लग्नाला उपस्थित होता.