चित्रपट हिट करण्यासाठी रामूची अश्लिल पोस्टर गर्ल

निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ऑनलाईन थिएटर लॉन्च करणार आहेत.

Updated: Feb 8, 2016, 08:40 PM IST
चित्रपट हिट करण्यासाठी रामूची अश्लिल पोस्टर गर्ल title=

मुंबई: निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ऑनलाईन थिएटर लॉन्च करणार आहेत. आरजीव्ही टॉकीज असं त्याचं नाव असेल. या प्लॅटफॉर्मवरून राम गोपाल वर्मा शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. राम गोपाल वर्मांनी ट्विटकरून याबाबतची माहिती दिली आहे. 

राम गोपाल वर्मा यांच्या या डिजीटल प्लॅटफॉर्मवरचा पहिला चित्रपट असेल सिंगल एक्स. या चित्रपटाचा पहिला फोटोही त्यांनी ट्विट केला आहे. 

डिजीटल तंत्रज्ञानामध्ये मला अधिक रस आहे, तसंच यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या निर्बंधाशिवाय इंटरनेटवर चित्रपट दाखवता येतील असंही राम गोपाल वर्मा म्हणाले आहेत. आरजीव्ही टॉकीजचा पहिला चित्रपट मी सेन्सॉर बोर्डाला डेडिकेट करत असल्याचंही राम गोपाल वर्मा म्हणाले आहेत.