'मर्दानी'... यशराजचा पहिला 'अॅडल्ट' सिनेमा!

Last Updated: Thursday, July 31, 2014 - 14:53
'मर्दानी'... यशराजचा पहिला 'अॅडल्ट' सिनेमा!

मुंबई : राणी मुखर्जीचा आगामी सिनेमा ‘मर्दानी’ लवकरच प्रेक्षकांच्या समोर येण्याच्या तयारीत आहे. या सिनेमाला नुकतंच अॅडल्ट सर्टिफिकेट देण्यात आलंय. 

‘मर्दानी’ हा यशराज फिल्म्सचा अॅडल्ट सर्टिफिकेट मिळवणारा पहिला सिनेमा ठरलाय. या सिनेमा चाइल्ड सेक्स, ट्रॅफिकिंग आणि वेश्यावृत्तीसारख्या समाज विघातक गोष्टींभोवती फिरतो. या समाज विघातक गोष्टींशी या सिनेमात राणी लढा देताना दिसणार आहे. 

पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणारी राणी एका ‘डॅशिंग’ अवतारात या सिनेमात दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅडल्ट सर्टिफिकेट देण्यात आलेल्या या सिनेमात असे काही सीन्स होते ज्यावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला होता. त्यानंतर काही सीन्स आणि डायलॉग्स या सिनेमातून हटवण्यात आले. 

नुकतीच विवाह बंधनात अडकलेली राणी मुखर्जी या सिनेमात पोलीस इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात एक माफिया एका मुलीचं अपहरण करतो. तिच्या सोडवणुकीसाठी शिवानी निर्भय होऊन माफियांशी लढताना या सिनेमात दिसतेय. या लढाईत शिवानीचं जीवन पूर्ण बदलून जातं. 

प्रदीप सरकार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. हा सिनेमा येत्या 23 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Thursday, July 31, 2014 - 14:53
comments powered by Disqus