'रेखाचं कुंकू अमिताभच्या नावाचं'

'रेखा अमिताभच्या नावानं आपल्या भांगात कुंकू लावते' असं म्हणलंय बिग बॉस फेम पुनीत इस्सर याच्या पत्नीनं... त्यामुळे, पुन्हा एकदा 'अमिताभ-रेखा प्रेमकहाणी'च्या चर्चेला उधाण आलंय.

Updated: Feb 24, 2015, 05:26 PM IST
'रेखाचं कुंकू अमिताभच्या नावाचं' title=

नवी दिल्ली : 'रेखा अमिताभच्या नावानं आपल्या भांगात कुंकू लावते' असं म्हणलंय बिग बॉस फेम पुनीत इस्सर याच्या पत्नीनं... त्यामुळे, पुन्हा एकदा 'अमिताभ-रेखा प्रेमकहाणी'च्या चर्चेला उधाण आलंय.

एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिलेल्या बातमीनुसार, पुनीत इस्सर याची पत्नी दीपाली हिनं अमिताभ-रेखाच्या नात्याविषयी हे वक्तव्य केलंय. 
 
आता, दीपालीच्या या वक्तव्यामागची खरी कहाणी तर हे मॅगझिन वाचकांसमोर आल्यानंतरच कळेल. पुनीत इस्सर नुकताच बीग बॉस सीझन ८ मध्ये दिसला होता. या कार्यक्रमाच्या एका भागात रेखा गेस्ट म्हणूनही दिसली होती. 


मॅगझिनचं कव्हर पेज

बीग बॉसमध्ये आलेल्या रेखानं पुनीतला थोडी तिखटच प्रतिक्रिया दिलेली सगळ्याच प्रेक्षकांनी पाहिलं होतं... पुनीतला उद्देशून 'और कितने गुनाह करोगे आप' असं म्हणत तिनं त्याला भर कार्यक्रमात टोमणाही मारला होता. रेखाचा हा टोमणा अमिताभला 'कुली' सिनेमाच्या शूटींगदरम्यान झालेल्या अपघातावरून असल्याचंही म्हटलं गेलं होतं. 

त्यामुळे, आता पुनीतच्या पत्नीचं - दीपालीचं रेखा-अमिताभच्या नात्यावर केलेलं हे वक्तव्य... नेमकं कोणत्या अर्थानं केलं गेलं? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.