सलमानच्या 'सुलतान'ची रिलीज डेट निश्चित

सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुलतान'बाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

Updated: Feb 12, 2016, 08:30 PM IST
सलमानच्या 'सुलतान'ची रिलीज डेट निश्चित title=

मुंबई: सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुलतान'बाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सलमानच्या या चित्रपटाच्या रिलीजची तारिखही जवळपास निश्चित झाली आहे. 

इतर चित्रपटांप्रमाणे सुलतान हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. 6 जुलै म्हणजेच बुधवारी हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.

 पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपटाला थिएटरमध्ये पाच दिवस मिळावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी सलमाननं आपले बरेच चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज केले, हा चित्रपट मात्र बुधवारी रिलीज करत, सलमान नवे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सज्ज झाला आहे.