वासेपूरची 'रिचा' करणार देसी कॅबरे!

‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील अभिनेत्री रिचा चड्ढा 'देसी कॅबरे' या चित्रपटात एका कॅबरे गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील दोन वर्षापासून या भूमिकेसाठी योग्य अशा अभिनेत्रीच्या शोधात असलेल्या पूजा भट्टचा शोध रिचा चड्ढाच्या रूपात पूर्ण झाला.

Updated: Nov 23, 2014, 07:58 PM IST
वासेपूरची 'रिचा' करणार देसी कॅबरे! title=

मुंबई :‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील अभिनेत्री रिचा चड्ढा 'देसी कॅबरे' या चित्रपटात एका कॅबरे गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील दोन वर्षापासून या भूमिकेसाठी योग्य अशा अभिनेत्रीच्या शोधात असलेल्या पूजा भट्टचा शोध रिचा चड्ढाच्या रूपात पूर्ण झाला.

पूजाला या भूमिकेसाठी एक नवोदित अभिनेत्रीही आवडली होती, पण शेवटी तिनं रिचाची निवड केली. पूजा म्हणाली, ‘मी एका नवोदित अभिनेत्रीला या चित्रपटासाठी साईन करणार होते, पण पुढं मला वाटलं की, या भूमिकेसाठी नवोदित अभिनेत्रींकडून फारशा अपेक्षा योग्य नाही.’ या चित्रपटात रिचाला कॅबरे करायचा आहे, पण तिला अभिनयही तेवढाच दमदार करावा लागणार आहे.

या भूमिकेसाठी रिचाला फिटनेसची आवश्यकता असून पूजाचा भाऊ राहुल भट्ट तिला यासाठी ट्रेनिंग देणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत गुलशन देवाईया मुख्य भूमिकेत दिसणार असून दिग्दर्शन नारायण नियोगी करणार आहेत.
सगळ्यांनाच रिचाच्या या कॅबरेची झलक लवकरच बघायला भेटणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.