ऋषी कपूर यांचा गांधी परिवारावर पुन्हा ट्विटर बॉम्ब

बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून नेहरु-गांधी परिवारावर टीका केली आहे.

Updated: May 20, 2016, 05:11 PM IST
ऋषी कपूर यांचा गांधी परिवारावर पुन्हा ट्विटर बॉम्ब title=

मुंबई: बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून नेहरु-गांधी परिवारावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी नवी दिल्लीतल्या नेहरु-गांधी परिवाराचं नाव देण्यात आलेल्या ठिकाणांचा नकाशा ट्विट केला आहे. फक्त नवी दिल्लीमध्येच 64 ठिकाणांना नेहरु-गांधी परिवाराची नावं देण्यात आली आहेत, असं या ट्विटमध्ये ऋषी कपूर यांनी म्हंटलं आहे. 

 

तीनच दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी याच मुद्द्यावर ट्विट केलं होतं, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधींचं नाव हटवण्यात यावं अशा मागणीचं ट्विट त्यांनी केलं होतं. वांद्रे-वरळी सी लिंक, फिल्म सिटी, दिल्ली विमानतळाचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती. तसंच बाप का माल समझ रखा था क्या, अशा आक्षेपार्ह ट्विटचाही यामध्ये समावेश होता.