ऋषी कपूर यांनी ट्विट केले काही दुर्मिळ फोटो

 ऋषी कपूर आज एका वेगळ्याच मूडमध्ये होतो. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आपले जया बच्चनपासून शिल्पा शेट्टी सोबतचे काही मासिकांच्या कव्हरपेजचे फोटो ट्विट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Updated: Jan 6, 2016, 09:22 PM IST
ऋषी कपूर यांनी ट्विट केले काही दुर्मिळ फोटो  title=

मुंबई :  ऋषी कपूर आज एका वेगळ्याच मूडमध्ये होतो. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आपले जया बच्चनपासून शिल्पा शेट्टी सोबतचे काही मासिकांच्या कव्हरपेजचे फोटो ट्विट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

आपल्या गोल्डन दिवसांमध्ये या सुंदर अभिनेत्रीसोबत फोटो शेअर करून ऋषी कपूर यांनी जुने दिवस आठवले. 

या अभिनेत्रींमध्ये जयाबच्चन, शिल्पा शेट्टी, तब्बू, ममता कुलकर्णी, श्रीदेवी आणि नीतू सिंग यांचा समावेश आहे. 

ऋषी कपूर यांनी या सर्व अभिनेत्रींसोबत काम केले असून त्यांच्या चित्रपटांनी चांगले प्रदर्शन केले आहे. 

यातील स्टार डस्ट'च्या १९७४ च्या कव्हरपेजवर काही वेगळ्या जोड्या आहेत. त्यात अमिताभ बच्चन-रेखा, दिलीपकुमार-हेमा मालिनी, धर्मेंद्र-नीतू सिंग आणि ऋषी कपूर- जया बच्चन असा एक दुर्मिळ फोटो आहे. 

पाहू या त्याचे ट्विट...