रितेश देशमुखच्या 'लय भारी'ला उदंड प्रतिसाद

Last Updated: Saturday, July 12, 2014 - 19:26
रितेश देशमुखच्या 'लय भारी'ला उदंड प्रतिसाद

मुंबई : रितेश देशमुखचा पहिला मराठी चित्रपट  'लय भारी'ला पहिल्याच दिवशी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसांचे शो हाऊस फुल असून मराठीतील हा आतापर्यंतचा  'लय भारी' चित्रपट असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली आहे.

चित्रपटातील अॅक्शन सीन्स रसिकांना आवडले असून सलमानही छोट्या रोलमध्ये चित्रपटात भाव खाऊन गेला आहे. रितेश देशमुखचा हा नविन मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्यांने चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. रितेशची मराठी चित्रपटात नायकाची भूमिका अनेकांना भावली आहे.

'बालक-पालक' या मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर रितेश देशमुख आता 'लय भारी' या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. रितेश प्रथमच मराठी नायिकाच्या भूमिकेत दिसला. त्याची ग्रामीण टपोरी प्रेक्षकांना भावली आहे. 

'डोंबिवली फास्ट'च्या यशस्वी चित्रपटानंतर निशिकांत कामतही मराठी चित्रपटाकडे वळला आहे. त्यानेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. 'लय भारी'चे संगीत अजय-अतुल यांनी दिलेय. त्यांचे 'विठ्ठल विठ्ठल' या गाण्याने वेड लावलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, July 12, 2014 - 19:17
comments powered by Disqus