मराठमोळी 'सई' झळकली फेमिनाच्या कव्हर पेजवर

सिनेसृष्टीतील मराठमोळी ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर प्रसिद्ध अशा फेमिना मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. फेमिनातर्फे नुकतंच सईला 'द मोस्ट पॉवरफूल वूमन ऑफ दि इअर अॅवॉर्ड'नं गौरविण्यात आलं होतं. 

Updated: Jun 4, 2015, 03:22 PM IST
मराठमोळी 'सई' झळकली फेमिनाच्या कव्हर पेजवर title=

मुंबई: सिनेसृष्टीतील मराठमोळी ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर प्रसिद्ध अशा फेमिना मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. फेमिनातर्फे नुकतंच सईला 'द मोस्ट पॉवरफूल वूमन ऑफ दि इअर अॅवॉर्ड'नं गौरविण्यात आलं होतं. 

तर आता सईला थेट फेमिनाच्या कव्हर पेजवर स्थान मिळाल्यानं तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार. फेमिनाच्या कव्हर पेजवर सई दुसऱ्यांदा झळकतेय. याआधीही एकदा सईला फेमिनानं कव्हर पेजवर झळकवत सरप्राईज दिलं होतं. 

बॉलिवूडच्याच अभिनेत्रींचा दबदबा असलेल्या फेमिनानं आता सईची दखल घेतलीय. एकूणच हंटरनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही सईच्या नावाची टिकटिक आता वाढू लागलीय, असं म्हणायला हरकत नाही.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.