बाहुबली-२च्या कलाकारांचे मानधन घ्या जाणून...

'बाहुबली २ द कनक्लूजन' या सिनेमाचे वादळ सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार घोंघावतेय. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने तर बॉलीवूड सिनेमांचे सर्वच रेकॉर्ड मोडीत काढलेत. पहिल्याच दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये या सिनेमाने १२८ कोटींचा गल्ला जमवला. मात्र तुम्हाला माहीत आहे का या सिनेमात काम करण्यासाठी या कलाकारांना किती पैसे मिळाले होते.. मीडियामधील रिपोर्टनुसार जाणून घ्या या कलाकारांचे मानधन...

Updated: May 2, 2017, 03:02 PM IST
बाहुबली-२च्या कलाकारांचे मानधन घ्या जाणून... title=

मुंबई : 'बाहुबली २ द कनक्लूजन' या सिनेमाचे वादळ सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार घोंघावतेय. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने तर बॉलीवूड सिनेमांचे सर्वच रेकॉर्ड मोडीत काढलेत. पहिल्याच दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये या सिनेमाने १२८ कोटींचा गल्ला जमवला. मात्र तुम्हाला माहीत आहे का या सिनेमात काम करण्यासाठी या कलाकारांना किती पैसे मिळाले होते.. मीडियामधील रिपोर्टनुसार जाणून घ्या या कलाकारांचे मानधन...

बाहुबली - प्रभास

बाहुबली फर्स्‍ट और बाहुबली 2 या दोन्ही सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या प्रभासला २५ कोटींचे मानधन देण्यात आलेय. 

भल्‍लालदेव - राणा दुग्‍गुबाती

सिनेमाच्या हिरोला जबदस्त टक्कर देणारा बाहुबलीतील सुपर व्हिलन अर्थात राणा दुग्‍गुबत्तीला या सिनेमासाठी १५ कोटींचे मानधन मिळालेय. 

देवसेना - अनुष्‍का शेट्टी

बाहुबली 2 ची लीड हिरोईन अनुष्का शेट्टी या सिनेमात अमरेंद्र बाहुबलीचीच्या पत्नीची भूमिका साकारतेय. या सिनेमासाठी अनुष्काला ५ कोटी रुपये मिळालेत. 

अवंतिका - तमन्‍ना भाटिया

बाहुबली २ सिनेमात अवंतिकेची भूमिका साकारणारी तमन्नाला या सिनेमासाठी ५ कोटी रुपये मिळालेत. 

शिवगामी देवी - रम्या कृष्णा

या सिनेमात राजमाता शिवगामी देवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णाला २.५ कोटी रुपये मिळालेत. 

कटप्‍पा - सत्‍यराज

ज्या प्रश्नाने दोन वर्षे रसिकांना बाहुबली २ची वाट पाहायला लावली तो प्रश्न म्हणजे कटाप्पाने बाहुबलीला का मारले?. या सिनेमात कटप्पाची भूमिका साकारणाऱ्या सत्यराज यांना या सिनेमासाठी २ कोटी रुपये मिळालेत.