जगातील टॉप १० घेणाऱ्या अभिनेत्यात तीन बॉलीवूड अभिनेते

 बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षय कुमार यांनी जगातील टॉप १० सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादी स्थान पटकावलं आहे. फोर्सने हॉलीवूड ते हाँगकाँग आणि बॉलिवूडची ग्लोबल यादी जाहीर केली. 

Updated: Aug 5, 2015, 03:25 PM IST
जगातील टॉप १० घेणाऱ्या अभिनेत्यात तीन बॉलीवूड अभिनेते title=

वॉशिंग्टन :  बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अक्षय कुमार यांनी जगातील टॉप १० सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादी स्थान पटकावलं आहे. फोर्सने हॉलीवूड ते हाँगकाँग आणि बॉलिवूडची ग्लोबल यादी जाहीर केली. 

अमिताभ बच्चन आणि सलमान खान हे दोघे या यादीत संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहेत. त्यांनी मागील वर्षी ३३.५ मिलियन डॉलरची कमाई केली आहे. त्यानंतर नवव्या स्थानावर अक्षय कुमार आहे. त्याने ३२.५ मिलियन डॉलरची कमाई केली आहे. 

दहा जणांच्या यादीत शाहरूख खानला स्थान मिळाले नाही. तो १८ व्या स्थानावर असून रणबीर कपूर ३० व्या स्थानावर आहे. दोघे अनुक्रमे २६ मिलियन डॉलर आणि १५ मिलियन डॉलरची कमाई केली आहे. 

या यादीत रॉबर्ट डॉवनी जुनिअर हा ८० मिलियन डॉलरसह पहिल्या स्थानावर आहे. आयर्न मॅनमुळे त्याला हे शक्य झाले आहे. त्यानंतर जॅकी चॅन याचा क्रमांक लागतो ५० मिलियन डॉलरच्या कमाईसह तो धक्कादायक रित्या दुसऱ्या स्थानावर आहे. 

वेन डिझेल (३), ब्रॅडली कॉपर (४) अॅडम सँडलर (५) टॉम क्रूज (६) आणि मार्क व्हेलबर्ग (१० ) स्थानावर आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.