'रेकॉर्डब्रेक' सल्लूमियाँला मिळाली 100 कोटींची 'ईदी'

प्रदर्शित झाल्यानंतर केवळ  पाचच दिवसांत सलमान खानच्या ‘किक' या चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केलाय. याचसोबत सलमान आणि त्याच्या या सिनेमानं आणखी एक रेकॉर्डही कायम केलाय. 

Updated: Jul 30, 2014, 07:19 PM IST
'रेकॉर्डब्रेक' सल्लूमियाँला मिळाली 100 कोटींची 'ईदी' title=

मुंबई : प्रदर्शित झाल्यानंतर केवळ  पाचच दिवसांत सलमान खानच्या ‘किक' या चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केलाय. याचसोबत सलमान आणि त्याच्या या सिनेमानं आणखी एक रेकॉर्डही कायम केलाय. 

सलमान खानचा हा सातवा चित्रपट आहे ज्यानं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 100 कोटींच्या घरांत पोहचणारे तब्बल सात चित्रपट देणारा सलमान हा पहिलाच अभिनेता ठरलाय. महत्त्वाचं म्हणजे, पहिल्या चार दिवसांतच 'किक’नं 98 कोटींचा आकडा पार केला होता.

100 कोटींचा आकडा पार करणारे सलमानचे सिनेमे... 
- सप्टेंबर 2010 मध्ये प्रदर्शित 'दबंग' हा सलमान खानचा पहिला चित्रपट होता ज्याने 100 कोटी रुपयांचा आकडा पार करत 138 कोटी रुपये कमवले

- जून 2011 मध्ये प्रदर्शित सलमान खान आणि असिनच्या 'रेडी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  120 करोड़ रुपये कमवले. 

- ऑगस्ट 2011 मध्ये प्रदर्शित सलमान खान आणि करीना कपूरच्या 'बॉडीगार्ड' या चित्रपटाने 148 कोटी रुपयांची कमाई केली

- 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रदर्शित झालेल्या कॅटरीना कैफ आणि सलमान खानच्या 'एक था टायगर' या चित्रपटानं जवळपास 198 कोटी रूपयांची कमाई केली होती.  

- 2 डिसेंबर 2012 ला प्रदर्शित झालेल्या चित्रपट 'दबंग 2'नं बॉक्स ऑफिसवर सुमारे 155 कोटी कमावले.

- यावर्षीच प्रकाशित झालेल्या 'जय हो' या चित्रपटाने 116 कोटी रुपयांची कमाई केली होती 

- आणि आता केवळ पहिल्या पाचच दिवसांत सलमानच्या ‘किक’नं 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.