हे काय सलमाननं कतरिनाला चक्क म्हटलं ‘कतरिना कपूर’?

१८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं. 

Updated: Nov 20, 2014, 12:27 PM IST
हे काय सलमाननं कतरिनाला चक्क म्हटलं ‘कतरिना कपूर’? title=

हैदराबाद: १८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं. 

एका रिपोर्टनुसार अर्पिताच्या लग्नात डांस परफॉर्मन्स दरम्यान सलमान खाननं कतरिनाला ‘कतरिना कपूर’ हाक मारली. सलमानची जीभ जरी घसरली असेल तरी कतरिनाला हे आवडलं की नाही, हे सांगता येत नाही. 

सलमान खान ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर डांस करण्यासाठी कतरिना कैफला आवाज देत होता. त्यानं दोन-तीन वेळा कतरिना कैफ आपल्यासमोर डांस करेल असं अनाऊंस केलं. पण ती आली नाही तेव्हा सलमाननं ‘कतरिना कपूर कॅन यू प्लीज कम ऑन स्टेज’ अशी हाक मारली. तेव्हा कतरिना थोडी दचकलीच पण नंतर तिनं आपल्या डांसनं सर्वांनाच खूश नाचवलं, असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. 

सलमाननं कतरिनाच्या लग्नाचं आमंत्रण कतरिना कैफला पण दिलं होतं. अर्पिताच्या लग्नात ती खूप खूश दिसत होती. रणबीर कपूरसोबत कतरिनाचं नातं आता सगळ्यांनाच माहितीय. पण आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या तोंडून सध्याच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून कॅटला कसं वाटलं असेल, हे तिलाच माहित. 

 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.