सलमान हिट अॅंण्ड रन प्रकरण : साक्षीदार जबाबाची मूळ प्रतच हरवली

सलमान हिट अॅंण्ड रन प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुंबई सत्र न्यायालयात एक मोठा खुलासा केलाय. सलमान खान हिट अॅंण्ड रन प्रकरणातील 63 पैकी फक्त 7 साक्षीदारांच्याच जबाबाची मूळ प्रत पोलिसांकडे आहे इतर 56 साक्षीदारांच्या जबाबाची मूळ प्रतच हरवली आहे.

Updated: Aug 21, 2014, 05:59 PM IST
सलमान हिट अॅंण्ड रन प्रकरण : साक्षीदार जबाबाची मूळ प्रतच हरवली title=

मुंबई : सलमान हिट अॅंण्ड रन प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुंबई सत्र न्यायालयात एक मोठा खुलासा केलाय. सलमान खान हिट अॅंण्ड रन प्रकरणातील 63 पैकी फक्त 7 साक्षीदारांच्याच जबाबाची मूळ प्रत पोलिसांकडे आहे इतर 56 साक्षीदारांच्या जबाबाची मूळ प्रतच हरवली आहे.

या घटनेच्या दिवशी पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत घटनेबाबत केलेली नोंद स्टेशन डायरी सहीत हरवली आहे. याच बरोबर आणखी अशा काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या पोलिसांकडून हरवल्या आहेत, अशी कबुलीच मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं नाराजी व्यक्त करत सलमान खान हीट अॅंण्ड रन प्रकरणातील सर्वात पहिले तपास अधिकारी किसन सिंघडे यांना नोटीस पाठवून 12 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. 

पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे हा खटला लांबला असून, पोलिसांनी योग्य पद्धतीनं आपली भूमिका बजावली असती तर हा खटला ऑगस्ट महिन्यात संपला असता. त्यामुळे आता 12 सप्टेंबर रोजी पोलीस न्यायालयात काय स्पष्टीकरण देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.