धक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड रन'च्या महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात आगीत खाक

सलमान खान 'हिट अँड रन' प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आलीय. आरटीआय अंतर्गत गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल मंत्रालय आगीत जळून खाक झाल्या आहेत.

Updated: May 28, 2015, 11:19 AM IST
धक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड रन'च्या महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात आगीत खाक title=

मुंबई: सलमान खान 'हिट अँड रन' प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आलीय. आरटीआय अंतर्गत गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल मंत्रालय आगीत जळून खाक झाल्या आहेत.

आरटीआय कार्यकर्ता मंसूर दर्वेश यांनी या केसबद्दल माहिती देण्यास नकार देत सरकारी विभागानं लिहिलंय की, २००२च्या सलमान खान हिट अँड रन प्रकरणात अनेक कागदपत्र २०१२च्या मंत्रालय आगीत जळून खाक झालेत म्हणून माहिती देऊ शकत नाही.

मंसूर यांनी सरकारच्या दोन्ही विभागांना आरटीआय अंतर्गत विचारलं होतं की, अभिनेता सलमान प्रकरणी राज्य सरकारकडून केस लढण्यासाठी आतापर्यंत किती काऊंसल, अॅडव्होकेट, सॉलिसिटर, लीगल अॅडवायझर आणि पब्लिक प्रॉसिक्युटर नियुक्त केले गेलेत. मंसूर यांनी या सर्वांच्या नावासह प्रकरणाची शिक्षा सुनावली त्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी एकूण किती खर्च झाला याची संपूर्ण माहिती मागविली होती. 

आरटीआयच्या उत्तरादाखल गृह विभागानं लिहिलं, २१ जून २०१२ ला मंत्रालयात लागलेल्या आगीत कागदपत्र आणि रेकॉर्ड जळून खाक झाले होते. ज्यात या केससंबंधीत कागदपत्र पण होते. म्हणून ही माहिती मिळू शकत नाही. 

२८ डिसेंबर २००२ला रात्री सलमान खानच्या लँड क्रूझर एसयूव्ही वांद्रे इथं फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर चढवली होती. यात ४ जण जखमी आणि एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी १२ वर्षांनंतर ६ मे २०१५ला मुंबई सेशन्स कोर्टानं सलमानला दोषी मानत पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. मात्र मुंबई हायकोर्टात आता हे प्रकरण आहे आणि सलमान सध्या जामीनावर बाहेर आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.